नितेश राणेंना कणकवलीतून निवडणूक अवघड

कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय. याच जिल्ह्यात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेला अखरेचा जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसचा हात पकडला. त्याआधीपासून सिंधुदुर्ग म्हटले की राणे हे समीकरण जुळले. राणेंचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी मोठा मुलगा नीलेश राणे यांना राजकीय आखाड्यात थेट लोकसभेला उतरले. पहिल्याच निवडणुकीत नीलेश विजयी झालेत. 

Updated: Oct 3, 2014, 03:49 PM IST
नितेश राणेंना कणकवलीतून निवडणूक अवघड   title=

कणकवली : कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय. याच जिल्ह्यात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेला अखरेचा जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसचा हात पकडला. त्याआधीपासून सिंधुदुर्ग म्हटले की राणे हे समीकरण जुळले. राणेंचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी मोठा मुलगा नीलेश राणे यांना राजकीय आखाड्यात थेट लोकसभेला उतरले. पहिल्याच निवडणुकीत नीलेश विजयी झालेत. 

मात्र, २०१४च्या निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र येवून राणेंविरोधात राजकीय लढा दिला. याचा परिणाम नीलेश यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर नारायण राणे नाराज झालेत आणि ते अधिकच आक्रमक झालेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या दुसऱ्या मुलाला आणण्याचा निर्धार केला आणि काँग्रेसकडून कणकवलीमधून उमेदवारी मिळविली. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. येथे राणे विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

राणे समर्थक आमदार राजन तेलीही इच्छुक होते. त्यांना तिकिट मिळणार नाही, असे समजताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीकडून तिकिट न मिळाल्याने भाजपकडून उमेदवारी भरली. आमदार राजन तेली यांचा नितेश राणे यांना विरोध होता. 

नितेश नारायण राणे. मूळचे कोकणातील कणकवलीचे. वास्तव्य चेंबूर, मुंबई. शिक्षण मुंबईतच झाले. काँग्रेस नेते नारायण राणे यांचे द्वितीय पूत्र. नितेश यांचा  जन्म २३ जून १९८२ रोजी झाला. त्यांनी २००८ ला काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. त्यांनी अमेरिकेतून एमबीए केले आहे.

नारायण राणे हे सुरुवातीपासून शिवसेनेत सक्रीय होते. ३ जुलै २००५ ला राणे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी कोकणातील कणकवलीत काही दिवस राहणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २००८ला प्रहार दैनिक सुरु केले. या दैनिकांची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.