भाजपला पाठिंबा देण्याची शिवसेनेची तयारी?

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्यास शिवसेना तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. 

Updated: Oct 20, 2014, 12:30 PM IST
भाजपला पाठिंबा देण्याची शिवसेनेची तयारी? title=

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्यास शिवसेना तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. 

शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर निर्णय झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतील अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

महाराष्ट्र विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही, यासमोर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसमोर निश्चितच अडचणी आहेत.

भाजपला सर्वात आधी सत्ता स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या निर्णयावर भाजपकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

मात्र  राष्ट्रवादी सरकारमध्ये सामिल न होता, पाठिंबा देण्याचं आपण मीडियात पाहिलंय, यावर पक्षात विचार सुरू असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलंय.

भाजपला २८८ पैकी १२३ जागा मिळाल्या आहेत, भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, शिवसेनेला  ६३ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ तर काँग्रेसला ४२ जागांवर विजय मिळवता आहे. बहुमतासाठी भाजपला १४५ जागांची गरज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.