भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा डॉन!

राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल सातत्यानं ओरड करणाऱ्या भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा एकेकाळचा मकोका डॉन संतोष आंबेकर सहभागी झाला होता. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर पक्षाच्या नाव नियुक्त आमदारांच्या विजय

Updated: Oct 20, 2014, 08:57 PM IST
भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा डॉन! title=

नागपूर: राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल सातत्यानं ओरड करणाऱ्या भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा एकेकाळचा मकोका डॉन संतोष आंबेकर सहभागी झाला होता. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर पक्षाच्या नाव नियुक्त आमदारांच्या विजय

मिरवणुकीत आंबेकरनं सहभाग घेलता होता. इतकेच नव्हे तर त्यानं मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांचं स्वागत देखील केलं होतं. आंबेकरवर एके काळी अनेक गुन्हे होते आणि अजूनही त्याच्यावर एका बिल्डरला खंडणी मागण्याचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 

बिल्डरला खंडणी मागण्यासंबंधीचे गुन्हा त्याच्यावर नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. या गंभीर विषयावर पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांना विचारलं असता, याबाबत पक्षश्रेष्ठी सांगतील आणि बंधित आमदारांना विचारणा होणार असल्याचं सांगितलं. पण या सारख्या विजय जुलुसात कोण-कोण सहभागी होते याकडे लक्ष देणं कठीण असल्याचा युक्तिवाद देखील त्यांनी केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.