चार दिवसांपासून जगण्यासाठी लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

येवलातील अपेक्षित उमेदवाराला मतदान केलं नाही हा राग मनात ठेवून पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू अखेर मृत्यू झालाय. जिजाबाई वाबळे असं त्या महिलेचं नाव आहे. त्या ६५ टक्के भाजल्या होत्या. 

Updated: Oct 20, 2014, 07:54 PM IST
चार दिवसांपासून जगण्यासाठी लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू title=

नाशिक: येवलातील अपेक्षित उमेदवाराला मतदान केलं नाही हा राग मनात ठेवून पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू अखेर मृत्यू झालाय. जिजाबाई वाबळे असं त्या महिलेचं नाव आहे. त्या ६५ टक्के भाजल्या होत्या. 

६० वर्षीय जेबूबाई यांनी येवला मतदारसंघात मतदान केलं होतं. येवला मतदारसंघातलं बाभूळगाव. मतदानाच्या दिवशी जानुबाईला मतदानयंत्रातलं तीन नंबरचं बटन दाबण्यास सांगण्यात आलं होतं. 
मात्र तिनं दोन नंबरचं बटन दाबलं. हे लक्षात आल्यानंतर अशोक बोरनारे, पांडुरंग बोरनारे आणि नंदकिशोर भूरक हे तिघेजण गुरूवारी रात्री जानुबाईच्या घरात घुसले आणि त्यांनी तिला जाब विचारला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी चक्क रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं. तिघांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं नाही, म्हणून मला जाळल्याचा आरोप तिनं पोलिसांना आपल्या जबाबात दिला. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटकही केली. 

 या घटनेनंतर जेबूबाईंना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यामुळं राजकीय धेंडांनी एका वृद्धेचा जीव घेतल्यानं, सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे.
दरम्यान, रूग्णालयात जानुबाईनं आपली आधीची जबानी फिरवली होती. पदर स्टोव्हवर पडल्यानं मी स्वतःच अपघातात जळाली, असं तिनं सांगितलं. तिच्या भावानंही हा अपघात असल्याचं स्पष्ट केलं.

निवडणुकांमध्ये लक्ष्मीदर्शनाचा खेळ कसा चालतो आणि हा खेळ जीवावरही कसा बेतू शकतो, हेच येवल्याच्या या घटनेवरून स्पष्ट होतं. या घटनेमागचा खरा प्रकार शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसांपुढं आहे. राजकीय दबावामुळं जानुबाईनं आधीची जबानी फिरवली का, याचाही शोध त्यांना घ्यावा लागणार आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमागच्या खऱ्या सूत्रधारांचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.