पुणे : यंदाच्या निवडणुकीत सगळीकडेच लक्ष्मीदर्शनाची चर्चा सुरु आहे. यातच, पेड न्यूजचाही प्रकार सर्रास दिसून येतोय. ‘पेड न्यूज’च्या बाबतीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतलीय ती पुणे जिल्ह्यानं...
होय, सर्वाधिक पेड न्यूज पुण्यात आढळून आल्या आहेतत... खुद्द पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिलीय. पुण्यात पेड न्यूजचे तब्बल ५१ प्रकार उघड झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण झालीय. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही जणांना ताब्यात घेतलं असून अनेक शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. प्रचार काळात पैसे, दारू आणि आचारसंहिता भंगाचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात साडेतीन कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून सव्वा लाखाची अवैध दारू पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.