भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार!

भाजपचा गेमप्लॅन तयार केला आहे. राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन सरकार स्थापन करण्यावर भर दिला आहे. एकदा का  सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार फोडून राज्यात स्थिर सरकार स्थापण करण्यावर  भर देण्यात येणार आहे. त्याचवेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्नही असणार आहे.

Updated: Oct 21, 2014, 12:45 PM IST
भाजपचा गेमप्लॅन, सेनेला सत्तेपासून दूर ठेवणार! title=

मुंबई : भाजपचा गेमप्लॅन तयार केला आहे. राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन सरकार स्थापन करण्यावर भर दिला आहे. एकदा का  सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार फोडून राज्यात स्थिर सरकार स्थापण करण्यावर  भर देण्यात येणार आहे. त्याचवेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्नही असणार आहे.

 विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर आला असला तरी सरकार स्थापनेसाठी आवश्यक २२ आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रश्न पक्षापुढे उभा राहिला आहे. भाजपने राज्यात चांगले प्रदर्शन केले आणि १२२ जागा पटकावल्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने  भाजपला दुसऱ्या पक्षांवर अबलंबून राहावे लागणार आहे. निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला तात्काळ पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपने सबुरीचे धोरण अवलंबितत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. 

मात्र, शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी  भाजपकडून हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करायचे. सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच २२ ते २४ आमदार फोडायचे आणि स्थिर सरकार द्यायचे, असा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. आधीच भाजपवर आयात केलेल्या उमेदवारांवर विजयी स्वार झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच भाजपकडून ही नवी खेळी करण्यात येत असल्याने राज्यात काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.