सोलापूर : महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख आहेत, गणपतराव देशमुख 94 वर्षांचे आहेत. गणपतराव देशमुख यांनी बाराव्या वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल 12 वेळेस विजयी झाले आहेत.
गणपतराव देशमुख यांनी शिवसेनेचे उमेदवार शाहाजीबापू राजाराम पाटील यांना 15 हजार 224 मतांनी हरवलं. गणपतराव देशमुख पहिल्यांदा 1962 मध्ये जिंकले होते, यानंतर 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2012 साली विधानसभेत 50 वर्ष पूर्ण केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
मात्र ते एवढ्या वेळेस विजयी होऊनही त्यांना अधिक काळ विरोधी पक्षांच्या बाकावर काढावे लागले. दोन वेळेस अल्पकाळासाठी ते मंत्रीही राहिले. सांगोला शहरात एका छोट्याशा घरात ते राहतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.