एक्झिट पोल : ‘इंडिया टीव्ही’च्या सर्व्हेत भाजप पहिल्या क्रमांकावर

‘इंडिया टीव्ही’च्या राज्यव्यापी सर्व्हेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ जाणारा दिसतोय. त्यापाठोपाठ दुसरा पक्ष आहे शिवसेना.. काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे - अन्य पाचव्या क्रमांकावर असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

Updated: Oct 15, 2014, 07:43 PM IST
एक्झिट पोल : ‘इंडिया टीव्ही’च्या सर्व्हेत भाजप पहिल्या क्रमांकावर  title=

मुंबई : ‘इंडिया टीव्ही’च्या राज्यव्यापी सर्व्हेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ जाणारा दिसतोय. त्यापाठोपाठ दुसरा पक्ष आहे शिवसेना.. काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे - अन्य पाचव्या क्रमांकावर असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

भाजप क्रमांक एकचा पक्ष 
या सर्वेत भाजपच्या वाटेला १२४ - १३४ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. 'मोदी' नावाच्या जोरावर या जागांमध्ये भाजपला यंदा तब्बल ७८ - ८८ जागांची लॉटरी लागणार असल्याचं यामध्ये दाखवण्यात आलंय. युती तुटल्याचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधी लाटेचा फायदा भाजपला झाल्याचं दिसतंय. मोदी फॅक्टर अजूनही कायम असल्याचे या सर्वेत दाखविण्यात आले आहे.

युती तुटण्याचा शिवसेनेला फायदा नाही
शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल, त्यांना ५१-६१ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ७-१७ जागांची वाढ दाखविण्यात आलीय. त्यामुळे युती तुटल्याचा फायदा तसेच सरकारविरोधी लाटेचा फारसा फायदा शिवसेनेला होणार नाही, असं या सर्व्हेवरून दिसतंय. 

काँग्रेसला दणका 
काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ३८-४८ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ४८ - ३४ जागांवर काँग्रेसला फटका बसू शकतो. पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ इमेजही मतदारांवर फारसा परिणाम टाकू शकलेली इथं दिसत नाही.   

राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर 
राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकाचा पक्ष असणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ३१ - ४१ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये राष्ट्रवादीलाही ३१ - २१  जागांचं नुकसान होईल, असं दिसतंय.  

राज ठाकरेंची आक्रमकाता फोल
मनसेला या सर्व्हेत ९-१५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या निवडणुकीत मनसेला १३ जागा मिळाल्या होत्या. 

इतरांना ९ - १५ जागा 
इतर नोंदणीकृत पक्ष आणि अपक्षांना मिळून ९ - १५ जागा मिळतील, असं या सर्व्हेवरून दिसतंय. २००९ मध्ये इतरांना ४१ जागा मिळाल्या होत्या.

 

पक्ष 

 जागा

भाजप                    

१२४ - १३४

शिवसेना                 

५१-६१

काँग्रेस   

३८-४८

राष्ट्रवादी                         

 ३१ - ४१

मनसे                   

९-१५

अपक्ष-इतर  

९-१५

एकूण         

288

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.