मुंबई : निवडणूक प्रचारात आघाडी घेणाऱ्या भाजपनं आपला जाहीरनामा मात्र सर्वात शेवटी प्रसिद्ध केलाय. भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख ‘दृष्टीपत्र’ असा करण्यात आलाय. मात्र, या दृष्टीपत्रात साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखंड महाराष्ट्राचा मुद्दा चांगलाच गाजतोय. पंतप्रधान मोदींनीदेखील आपल्या भाषणांमधून राज्यातल्या जनतेला अखंड महाराष्ट्राची हमी दिलेली होती. मात्र, स्वतंत्र विदर्भ ही भाजपची भूमिका असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळं भाजपच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपनं सावध भूमिका घेत हा मुद्दा टाळल्याचं बोललं जातंय.
काय आहे भाजपच्या 'दृष्टीपत्रा'त?
* एलबीटी रद्द करणार
* करांचे सुसुत्रीकरण करून इंधनाचे दर कमी करणार
* एका वर्षात राज्य लोडशेडींगमुक्त करणार
* ठिबक सिंचनाला ९० टक्के अनुदान देणार
* नवा सहकार कायदा आणणार
* शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना
* अन्नदाता आधार पेन्शन योजना
* महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा
* सरकारी कामं ठराविक मुदतीत न करणाऱ्या अधिकाऱ्याकडून नुकसान भरपाई घेतली जाणार
* आयटी उद्योग परिसर विकास प्राधिकरण स्थापन करणार
* इव्हिनिंग कोर्ट सुरू करणार
* मराठी शाळांच्या आर्थिक सबलीकरणाची योजना
* महिलांसाठी 'माहेरचा आधार' नावाच्या योजनेद्वारे पेन्शन
* शिवाजी महाराज, बाबासाहेबांच्या स्मारकाची ५ वर्षात उभारणी
* श्रमिक पत्रकरांना ६५ वर्षांनंतर १५०० रूपये वेतन
* ऊस तोडणी कामगार महामंडळ स्थापन करणार
* महिला आणि बालगुन्हेगारांसाठी एका वर्षाच्या आत नवा कायदा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.