Year Ender 2015 : सेलिब्रिटी आणि वाद!

 'वाद' आणि 'बॉलिवूड' हे अतूट नातं सरत्या वर्षातही ठसठशीतपणे दिसून आलं... एखाद्या सेलिब्रिटीनं एखाद्या सामाजिक गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं आणि तो वादात अडकला नाही तरच नवल... किंवा काहींची वाद ओढवून घ्यायची सवयच त्यांना नडते.

Updated: Dec 17, 2015, 05:52 PM IST
Year Ender 2015 : सेलिब्रिटी आणि वाद! title=

मुंबई : 'वाद' आणि 'बॉलिवूड' हे अतूट नातं सरत्या वर्षातही ठसठशीतपणे दिसून आलं... एखाद्या सेलिब्रिटीनं एखाद्या सामाजिक गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं आणि तो वादात अडकला नाही तरच नवल... किंवा काहींची वाद ओढवून घ्यायची सवयच त्यांना नडते.

याकूबच्या फाशीवर सलमानचं ट्विट
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या फाशीसंबंधी बोलताना 'एका निष्पाप व्यक्तीला फाशीची शिक्षा देणे, ही माणूसकीची हत्या आहे, याकूबऐवजी टायगर मेमनला फाशी द्या' असं ट्विट सलमाननं केलं... आणि तो फसला... वडिलांनी कान उघडनी केल्यानंतर त्यानं याबद्दल माफीही मागितली. 

अधिक वाचा - ओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख, राज ठाकरेंची प्रतिक्रिया

अधिक वाचा - सलीम खान यांनी सलमानला सुनावलं

अधिक वाचा - याकूब ट्विट प्रकरणी बोलण्यास सलमानचा नकार

अधिक वाचा - सलमान अखेर घाबरला, माफी मागितली

असहिष्णुतेवर शाहरुख बोलला... 
'भारतात असहिष्णुता वाढतेय' असं म्हणत किंग खान शाहरुखनंही वाद ओढावून घेतला. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान शाहरुखनं हे वक्तव्य केलं. त्यानंतर, राजकारण्यांमध्येही शाहरुखवर टीका करण्याची स्पर्धाच लागली. 

अधिक वाचा - 'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गी

अधिक वाचा - 'दिलेवाले'वर महाराष्ट्राने बहिष्कार घालावा - मनसे

अधिक वाचा - असहिष्णुता प्रकरण : आमिरच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले

 

आमिरचं 'असहिष्णुते'वरचं वक्तव्य 
शाहरुखप्रमाणेच आमिरनं कळत-नकळतपणे असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आपलं मत मांडत वाद ओढावून घेतला. आपली पत्नी 'किरण राव हिला देशात सुरक्षित वाटत नाहीय... त्यामुळेच, तिनं आपल्याला एकदा देश सोडून जाण्याचाही सल्ला दिला होता' असं वक्तव्य आमिरनं केलं... आणि त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोडच उठली. 

अधिक वाचा - अभिनेता आमिर खानने ओढवून घेतलेले वाद

अधिक वाचा - सोशल मीडियावर 'असहिष्णुता', आमिरला ५३ लाख कानाखाली

अधिक वाचा - असहिष्णुता : आमिरच्या विधानावर अभिनेत्री नगमा म्हणाली, कोणता डोंगर कोसळलाय देशावर?

अधिक वाचा - आमिर वादात आता गायक सोनू निगम

अधिक वाचा - आमिरला कानाखाली मारणाऱ्याला शिवसेनेकडून एक लाख रुपये

अधिक वाचा - 'वेल डन आमिर...' - ऋतिकनं आमिरला दिला जाहीर पाठिंबा

अधिक वाचा - असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

अधिक वाचा - आमिर खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

अधिक वाचा - आमिरची भावना योग्यच; मीही ठरलोय असहिष्णुतेचा शिकार - रहमान

अधिक वाचा - तुमचा विरोध आमिरच्या विधानांना बळकटीच देतोय - शरद पवार

अधिक वाचा - आमिरचं जरा अतिच झालं - मिल्खा सिंह

 

गायक अभिजीतची वटवट

सलमान खानच्या २००२ सालच्या 'हिट अॅन्ड रन' केसमध्ये सलमानची पाठराखण करताना गायक अभिजीतनं 'जो रस्ते पे सोयेगा वो, कुत्ते की मौत मारा जायेगा... रस्त्यावर झोपणे हे आत्महत्या करण्यासारखं आहे' असं वादग्रस्त ट्विट केलं. तसंच दुर्गापूजे दरम्यान एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणीही अभिजीतवर तक्रार दाखल करण्यात आली होती.   

अधिक वाचा - सलमान प्रकरणी गायक अभिजितने तोडले अकलेचे 'चांद तारे'

अधिक वाचा - मुक्ताफळे उधळणाऱ्या अभिजितने मागितली माफी

अधिक वाचा - गायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात छेडछाडीची तक्रार

 

राधे माँ विरुद्ध डॉली बिंद्रा
हुंड्यासाठी मुंबईतील एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणात स्वयंघोषित देवी राधे माँ हिचं नाव आलं आणि ही 'माँ' प्रकाशझोतात आली. त्यानंतर राधे माँ चे अनेक वादग्रस्त व्हिडिओही प्रकाशझोतात आले. याच दरम्यान, बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्रा हिनं राधे माँ हिच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे, या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं. 

अधिक वाचा - राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

अधिक वाचा - व्हिडिओ : माजी प्रियकरानं केली राधे माँची पोलखोल!

अधिक वाचा - टल्ली बाबा आणि छोटी माँ ही राधे माँचीच मुलं?

अधिक वाचा - कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

अधिक वाचा - किती आहे राधे माँचा बँक बॅलन्स

 

गुलाम अलींना विरोध

९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी कलाकार गझलकार गुलाम अली यांच्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला शिवसेनेने तीव्र विरोध केल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करायला लावला. हा कार्यक्रम रद्द केला नाही तर शिवसेना स्टाईल निषेध करु, अशी धमकीच शिवसेनेने दिली होती. 

अधिक वाचा - शिवसेनेची धमकी, गुलाम अली लखनऊला आले तर कुलकर्णींपेक्षा वाईट हालत करू

अधिक वाचा - भारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली

अधिक वाचा - 'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली

अधिक वाचा - 'हिंदू सौदी' बनतोय भारत, तस्लिमा नसरीन यांची टीका

अधिक वाचा - शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

 

एफटीआयआयचा वाद आणि पुरस्कार वापसी
यंदाच्या वर्षात साहित्य क्षेत्रातही मोठा असंतोष पाहायला मिळाला... मग ते एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर नोंदवलेला निषेध असो किंवा देशातील वाढत्या असहिष्णुतेचा धिक्कार करत अनेक विचारवंतांनी केलेली पुरस्कार वापसी... वेगवेगळ्या विचारांनी देश ढवळून निघाला. 

अधिक वाचा - 'मनमानी धोरण एका इन्स्टिट्यूटपुरतं नाही तर संपूर्ण देशभर'

अधिक वाचा - पुरस्कार परत करणाऱ्या फिल्ममेकर्सवर अनुपम खेर भडकले

अधिक वाचा - सोशल मीडियावर 'असहिष्णुता', आमिरला ५३ लाख कानाखाली

अधिक वाचा - एफटीआयआय विद्यार्थ्यांचा संप मागे, गजेंद्र चौहान यांना विरोध कायम