Year Ender 2015 : बॉलिवूडचे 'ब्लॉकबस्टर्स'!

२०१५ मध्ये मोठ्या पडद्यावर झळकलेल्या पिकू, तनू वेडस मनू आणि एबीसीडी २ अशा सिनेमांनीही बॉलिवूडला बक्कळ कमाई करून दिलीच... परंतु, बजरंगी भाईजान, बाहुबली आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांनीही तर अमाप यश मिळवलं... बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन सिनेमेही याच रांगेत आहेत. 

Updated: Dec 17, 2015, 05:52 PM IST
Year Ender 2015 : बॉलिवूडचे 'ब्लॉकबस्टर्स'! title=

मुंबई : २०१५ मध्ये मोठ्या पडद्यावर झळकलेल्या पिकू, तनू वेडस मनू आणि एबीसीडी २ अशा सिनेमांनीही बॉलिवूडला बक्कळ कमाई करून दिलीच... परंतु, बजरंगी भाईजान, बाहुबली आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांनीही तर अमाप यश मिळवलं... बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन सिनेमेही याच रांगेत आहेत. 

तनू वेडस् मनू रिटर्न
या सिनेमात डबल रोलमध्ये दिसलेली  कंगना रानौत भलतीच भाव खाऊन गेली. अभिनेता आर. माधवनही या सिनेमात प्रमुख सिनेमात दिसला. 'तनू वेडस मनू' या सिनेमाचा हा सिक्वेल होता. 
 

एबीसीडी २
नृत्य दिग्दर्शक म्हणून नावाजलेल्या रेमो डी-सुझानं 'एनी बडी कॅन डान्स' या हिटनंतर त्याच्या सिक्वेलसहीत बॉलिवूडला आणखीन एक हिट सिनेमा दिला. वरून धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासहीत अनेक प्रोफेशनल डान्सर्स या सिनेमात दिसले.

बाहुबली
एस. एस. राजामौली यांनी बाहुबली या सिनेमाद्वारे भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या सिनेमानं जगभरात ५०० करोडहून अधिक कमाई केलीय. या सिनेमाचा सिक्वेलही लवकरच येण्याच्या तयारीत आहे. 

बजरंगी भाईजान
खान भाईजान असतील आणि तो सिनेमा कमाई करणार नाही... हे तर शक्य नाही... त्यातून बजरंगी भाईजान हा तर भारत - पाकिस्तानच्या संबंधांवर भाष्य करणारा चित्रपट... त्यामुळे सलमान खान भलताच भाव खाऊन गेला. सलमान आणि कबीर खान यांनी 'बजरंगी भाईजान'च्या निमित्तानं एकत्र काम केलं.

प्रेम रतन धन पायो
हा सिनेमा म्हणजे २०१५ या वर्षातला दिवाळी धमाका ठरला. सूरज बडजात्या दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा 'प्रेम' म्हणून प्रेक्षकांसमोर आला. हा सिनेमा एक फूल्ल फॅमेली एन्टरटेनर सिनेमा ठरला. या सिनेमानं आत्तापर्यंत ४०० करोडहून अधिक कमाई केलीय.