रईस- ए दिल है मुश्कील ला विरोध कायम- मनसे

पाकिस्तानी कलाकरांच्या भूमिकेमुळे वादात अडकेलल्या ए दिल है मुश्कील आणि रईस या दोन चित्रपटांच्या रिलीजसाठी आज इम्पानं आपलं वजन टाकण्याचा प्रयत्न केला.

Updated: Oct 6, 2016, 02:15 PM IST
रईस- ए दिल है मुश्कील ला विरोध कायम- मनसे title=

मुंबई : पाकिस्तानी कलाकरांच्या भूमिकेमुळे वादात अडकेलल्या ए दिल है मुश्कील आणि रईस या दोन चित्रपटांच्या रिलीजसाठी आज इम्पानं आपलं वजन टाकण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या चित्रपट सेनेनं हे दोन्ही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

पण वादाचं केंद्र असणारे पाकिस्तानी कलाकार मात्र पैसे घेऊन निघून गेलेत. आता इथल्या लोकांचं नुकसान करून काय मिळणार असा युक्तीवाद आज इम्पाच्या सदस्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिका-यांसमोर केला. पण दोन्ही चित्रपटांना विरोध कायम असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केला आहे.

मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या दोन्ही चित्रपटांवर टांगती तलवार कायम आहे. करण जोहरच्या ए दिल है मुश्किलमध्ये फवाद खान तर शाहरुख खानच्या रईसमध्ये माहिरा खान हे दोघं पाकिस्तानी कलाकार आहेत.