बिग बॉसच्या फायनलमध्ये कोण आहे पुढे ? बिग बॉसच्या घरातली एक्सक्लुझिव्ह माहिती

Updated: Jan 22, 2016, 11:32 PM IST
बिग बॉसच्या फायनलमध्ये कोण आहे पुढे ? बिग बॉसच्या घरातली एक्सक्लुझिव्ह माहिती title=

मुंबई- बिग बॉस सिझन 9 च्या ग्रॅन्ड फिनालेसाठीच्या व्होटिंग लाईन्स बंद व्हायला आता काही तासच बाकी आहेत. शनिवारी या सिझनच्या शेवटच्या भागाचं शूटिंग होणार आहे. 104 दिवसांच्या या शूटनंतर अखेर 4 स्पर्धकांमध्ये ही फायनल पार पडत आहे. किथ सिक्वेरियाला बिग बॉसच्या घरातून आठवड्याच्या मध्येच बाहेर जावं लागलं, त्यानंतर मंदना करिमी, प्रिन्स नरुला, रोशेल राव आणि रिशभ सिन्हा या चौघांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्याची स्पर्धा लागली आहे. 

बिग बॉसच्या घरातील एक एक्सक्लुझिव्ह माहिती आमच्या हाती लागली आहे. ग्रॅन्ड फिनालेच्या फायनलमध्ये कोण पुढे आहे (शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) याची माहिती आम्हाला कळाली आहे. 

4 नंबरला रोशेल राव: मागच्या आठवड्यामध्ये रोशेल राव सगळ्यांच्या पुढे होती, पण या आठवड्यात मात्र तिला जोरदार धक्का बसलाय. रोशेल फायनलच्या या आठवड्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.
3 नंबरला मंदना करिमी : यंदाच्या पूर्ण सिझनमध्ये मंदनाच्या फॅन्सनी तिला मोठी साथ दिली, शेवटच्या आठवड्यात मात्र तिचे फॅन्स व्होटिंगच्या बाबतीत मागे पडत असल्याचं चित्र आहे. 
तर दोन नंबरला आहे रिशभ सिन्हा. एक नंबर आणि दोन नंबरच्या व्होटिंगमध्ये फारसा फरक नसल्यामुळे रिषभला एक नंबरवर जायची शक्यता आहे, पण त्यासाठी रिषभच्या फॅन्सना त्याच्यासाठी व्होट करावं लागेल. 

प्रिन्स नरुला या चौघांमध्ये सगळ्यात पुढे आहे. प्रिन्सच्या फॅन्सनं त्याला अशीच साथ दिली तर यंदाची बिग बॉसची ट्रॉफी प्रिन्सला मिळण्यात कोणताच अडथळा येणार नाही.