मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॅटरीचा स्फोट होण्याच्या तक्रारी तसेच फ्लाईटमध्ये घालण्यात आलेली बंदीनंतर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही सॅमसंग कंपनीबाबत तक्रार केलीये.
अमिताभ यांनी याबाबत ट्विटर करुन ही तक्रार केलीये. आपल्या फोनची बॅटरी कधीच फुल्ल चार्ज होत नाहीत अशी तक्रार केलीये.
अमिताभ सॅमसंगचा नोट-७ वापरतात. मात्र याची बॅटरी केवळ ६० टक्केच चार्ज होते. ही १०० टक्के चार्ज कधी होणार. मिस्टर सॅमसंग उत्तर द्या, असे त्यांनी ट्विट केलेय.
T 2395 -I have Samsung Note 7. Battery charge restricted to 60%. When will it allow me to go 100 ? Mr Samsung please respond ! zara jaldi ! pic.twitter.com/VVkzPqXh1j
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 30, 2016