मुंबई : पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नव्हेत, असं वक्तव्य अभिनेता सलमान खाननं केलं. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही सलमान खानच्या सुरात सूर मिसळला आहे.
काम करण्यासाठी पाकिस्तानी कलाकारांना आम्ही बोलावतो, यामध्ये त्यांची चूक काय? पाकिस्तान सरकारच्या कारवायांना हे कलाकार जबाबदार नाहीत, असं श्याम बेनेगल म्हणाले आहेत. आम्ही पाकिस्तानी जनतेच्या विरोधात नाही. पाकिस्तानी जनताही भारतीय जनतेच्या विरोधात नाही. जे वाद आहेत ते दोन्ही सरकारमध्ये आहेत, अशी प्रतिक्रिया श्याम बेनेगल यांनी दिली आहे.