VIDEO : कान्समध्ये चर्चिलेला 'मसान'चा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक निरज घायवन याच्या 'मसान' या पहिल्या-वहिल्या सिनेमानं कान्स इंटरनॅशनल फेस्टीव्हलमध्ये एकच धूम उडवून दिली होती. याच सिनेमाचा ट्रेलर आता भारतात प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jun 27, 2015, 01:09 PM IST
VIDEO : कान्समध्ये चर्चिलेला 'मसान'चा ट्रेलर प्रदर्शित title=

नवी दिल्ली : दिग्दर्शक निरज घायवन याच्या 'मसान' या पहिल्या-वहिल्या सिनेमानं कान्स इंटरनॅशनल फेस्टीव्हलमध्ये एकच धूम उडवून दिली होती. याच सिनेमाचा ट्रेलर आता भारतात प्रदर्शित करण्यात आलाय. 

दोन महिलांच्या माध्यमातून भारतीय समाजाची काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आलाय. 

वाराणसीच्या तटावर राहणाऱ्या दोन स्त्रियांची कहाणी या चित्रपटात चित्रीत करण्यात आलीय. 

अभिनेत्री रिचा चढ्ढा, श्वेता त्रिपाठी, विकी कौशल यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. हा सिनेमा २४ जुलै रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

व्हिडिओ पाहा :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.