मुंबई : पुंडलिक वरदे हारी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत अभंगाला सुरुवात होते. 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओची विशेष बाबा म्हणजे यामध्ये अनोख्या ढंगात पॉप म्युझिक वाजवले असले तरीही जो भाव आहे तो वारीचाच आहे. त्यामुळे या व्हिडिओला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. अभंग रिपोस्ट या ग्रुपद्वारे आणखी एक व्हिडिओ तयार करण्यात आलाय.
२८ जून रोजी आळंदीहून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल आणि १४ जुलैला पालखी पंढरीत दाखल होईल, ही माहिती पालखीचे मालक राजेंद्र आकफळकर यांनी सांगितले आहे. वारीच्या दिवसात सोशल मीडिया देखील विठ्ठलाच्या नामस्मरणात अगदी नाहून निघावेत यासाठी यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे.