व्हिडिओ : १२ रुपये देणाऱ्याला सोनूनं दिलं गोडं सप्राईज

गेल्याच आठवड्यात फाटक्या अवस्थेत रोडवर गाणं गात फिरणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाला आपण पाहिलं होतं... हा होता सोनू निगम... सोनूनं या अवतारात येऊन आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक सप्राईज दिलं होतं... पण, सोनूलाच या प्रसंगातून एक आनंददायक अनुभव मिळाला होता तो एका तरुणामुळे... 

Updated: May 24, 2016, 07:33 PM IST
व्हिडिओ : १२ रुपये देणाऱ्याला सोनूनं दिलं गोडं सप्राईज title=

मुंबई : गेल्याच आठवड्यात फाटक्या अवस्थेत रोडवर गाणं गात फिरणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाला आपण पाहिलं होतं... हा होता सोनू निगम... सोनूनं या अवतारात येऊन आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक सप्राईज दिलं होतं... पण, सोनूलाच या प्रसंगातून एक आनंददायक अनुभव मिळाला होता तो एका तरुणामुळे... 

हा फाटक्या अवस्थेत गाणारा सोनू निगम आहे हे माहीत नसताना एका तरुणानं या गायकाच्या हातात गुपचूपपणे १२ रुपये टेकवले होते. यू ट्यूब चॅनल 'बिईंग इंडियन'चा 'द रोडसाईड उस्ताद' या व्हिडिओत हा किस्सा पाहायला मिळाला होता. 

आता सोनूनं आणि टीमनं या तरुणाला शोधून काढलंय... आणि त्याची भेट प्रत्यक्ष सोनू निगमशी त्याच्याच घरी घडवून आणली. हा अनुभव या तरुणासाठी खूपच आनंद देणारा ठरला. या तरुणाचं नाव आहे शहबाज अली सय्यद...