व्हिडिओ : आमिरचा 'ठरकी छोकरो' अंदाज

आमिरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'पीके' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे गाणं लॉन्च करण्यात आलं. 

Updated: Nov 8, 2014, 06:59 PM IST
व्हिडिओ : आमिरचा 'ठरकी छोकरो' अंदाज title=

मुंबई : आमिरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'पीके' या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे गाणं लॉन्च करण्यात आलं. 

या गाण्यात आमीर बनलाय 'ठरकी छोकरो'... मुलगी आणि मुलगा यांतील फरकही या ठरकी छोकऱ्याला कळत नाहीय... अशी या गाण्याची थिम आहे. आमिर खान आणि संजय दत्त यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 

काही दिवसांपूर्वी 'पीके'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता जो प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला होता. या सिनेमाचा दिग्दर्शक आहे राजकुमार हिरानी.. तर या सिनेमाचा निर्माता आहे विधू विनोद चोप्रा... 
या सिनेमात आमिरसोबतच अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंह राजपूत हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.