व्हिडिओ : मल्लिकाचं हॉट 'डर्टी पॉलिटिक्स'!

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल आणि अनेकदा वादात अडकलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका हॉट अवतारात दाखल झालीय. मल्लिकाच्या 'डर्टी पॉलिटिक्स' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Dec 27, 2014, 09:37 AM IST
व्हिडिओ : मल्लिकाचं हॉट 'डर्टी पॉलिटिक्स'! title=

मुंबई : बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल आणि अनेकदा वादात अडकलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका हॉट अवतारात दाखल झालीय. मल्लिकाच्या 'डर्टी पॉलिटिक्स' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

यू ट्यूबवर हा ट्रेलर आत्तापर्यंत साडे आठ लाखांहून जास्त वेळा पाहिला गेलाय.

राजस्थानच्या राजकारणातील चर्चित भवंरी देवी हत्या कांडावर आधारित हा सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. या सिनेमात भंवरी देवीच्या भूमिकेत मल्लिका शेरावत दिसतेय. 

या सिनेमात अनुपम खेर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी आणि आशुतोष राण या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची निर्मिती केलीय के सी बोकाडिया यांनी... 

सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये तिरंगा अंगावर लपटलेल्या मल्लिकाच्या फोटोमुळेही यापूर्वी वाद झालायय. 
 

व्हिडिओ पाहा - 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.