सलमानने केली वरूण धवनची प्रशंसा

 बॉलीवूड अभिनेता वरूण धवन याला आता नवा प्रशंसक मिळाला आहे. हा कोणी साधा प्रशंसक नाही, तर सुपरस्टार सलमान खान आहे. वरूणचा नवा चित्रपटाचा 'बदलापूर' टीझर नुकताच रिलीज झाला, यावर सलमानने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Dec 5, 2014, 06:39 PM IST
सलमानने केली वरूण धवनची प्रशंसा title=

मुंबई :  बॉलीवूड अभिनेता वरूण धवन याला आता नवा प्रशंसक मिळाला आहे. हा कोणी साधा प्रशंसक नाही, तर सुपरस्टार सलमान खान आहे. वरूणचा नवा चित्रपटाचा 'बदलापूर' टीझर नुकताच रिलीज झाला, यावर सलमानने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

सलमानने टीझरबद्दल ट्विट केले की, 'वा यार, कमाल करतो मिस्टर वरूण. बदलापूर? चित्रपट चांगला वाटतोय. वडिलांचा रेकॉर्ड तोड लवकर. तुझ्यावर मी खूप खूश आहे. 

श्रीराम राघवन दिग्दर्शीत 'बदलापूर'मध्ये सिनेप्रेमींना वरूणचा वेगळा अंदाज दिसणार आहे. या चित्रपटात वरूणने पहिल्यांदा गंभीर भूमिका केली आहे. तो म्हणतो प्रेक्षकांना हा नवा अवतार नक्की पसंत पडणार आहे. 

वरुणने 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'मैं तेरा हीरो' आणि 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून एका दिलफेक युवकाची भूमिका निभावली होती. आता तो गंभीर भूमिकेत दिसणार आहे. 

हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. बदलापूर २००० वर्षांच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. यात वरूण मारामारी आणि हत्या करताना दिसणार आहे. 

या चित्रपटात हुमा कुरैशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, यामी गौतम आणि विनय पाठक प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.