मुंबई : 'सैराट' हा मराठी सिनेमा दक्षिणेकडील भाषेत रिलीज झाला. मराठीतील ही घौडदौड सुरुच आहे. आता झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका कन्नड भाषेत डबिंग करण्यात आली आहे.
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. आता त्यांचे लग्न 5 मार्च 2017 ला होणार आहे. या मलिकेत अधिक रंगत आली आहे.
पाहा हा व्हिडिओ :