Gossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न

एका काळी हृतिक-सुझानची जोडी बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी मानली जात होती. मात्र काळ असा बदलला की १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झालंय. आता सुझान दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Updated: Sep 15, 2015, 12:58 PM IST
Gossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न title=

मुंबई : एका काळी हृतिक-सुझानची जोडी बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी मानली जात होती. मात्र काळ असा बदलला की १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झालंय. आता सुझान दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या ताज्या गॉसिपनुसार सुझान हृतिकच्या एका खास मित्रासोबत लग्न करणार आहे. तोच मित्र ज्याच्या प्रेमात पडून इतका वर्षांचा संसार त्यांनी मोडला. आता हा खास मित्र बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आहे की दुसरा कुणी हा तर येणारा काळच सांगेल.

तर दुसरीकडे बातमी आहे की, अर्जुन रामपालने सुद्धा पत्नी मेहरसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केलाय. अफवांच्या चर्चेत बातमी अशीही आहे की, सुझानचे आई-वडील तिच्या दुसऱ्या लग्नाच्या विरोधात आहे.

हृतिक आणि सुझानचं लग्न २००० साली झालं होतं. त्यांना रिहान आणि रिधान नावाची दोन मुलं आहेत. डिसेंबर २०१३मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.