मुंबई : ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवारच्या यशात सर्व बच्चे कंपनींचा लाडक्या छोटा भीमचा मोठा हात आहे.
सनी पवार यांची तब्बल २ हजार मुलांमधून लायन या चित्रपटासाठी निवड झाली. सनी पवार हा मराठी असून तो अस्खलित हिंदी बोलतो. घरात तो सोलापूरकडील कैकाडी भाषा बोलतो. पण शाळेत तो इंग्रजी बोलतो. पण टीव्हीवर छोटा भीम पाहून त्याने हिंदी भाषा चांगली केली. याचा फायदा त्याला लायन चित्रपटातही झाला.
आता विविध चॅनलला तो मुलाखती देत आहेत. त्यावेळी तो मराठी पेक्षा हिंदीच बोलत आहे. त्याला ती सोपी आणि सहज वाटते आहे.