सनी लिऑनने यामुळे केला 'मस्तीजादे'

बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे आपलं स्थान पक्कं करणारी सनी लिऑन आता स्वत:चं एक वेगळं अस्तित्व आणि इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतेय. तिला असं काही करायचं आहे जे तिने बॉलिवूडमध्ये अजून नाही केलं. ज्यामुळे तिची क्षमता लोकं ओळखू शकतील.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 22, 2016, 07:10 PM IST
सनी लिऑनने यामुळे केला 'मस्तीजादे' title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे आपलं स्थान पक्कं करणारी सनी लिऑन आता स्वत:चं एक वेगळं अस्तित्व आणि इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतेय. तिला असं काही करायचं आहे जे तिने बॉलिवूडमध्ये अजून नाही केलं. ज्यामुळे तिची क्षमता लोकं ओळखू शकतील.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सनी म्हणते की, मस्तीजादे हा सिनेमा केल्यानंतर तिला कॉमेडी सिनेमांचे ऑफर येऊ शकतात. माझ्याकडे आणखी २ वेगळ्या प्रकारचे सिनेमे आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांना माझ्या वेगळ्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

सनी म्हणते की, मस्तीजादे मी डबल रोलमुळे केला आणि मला दोन्ही रोल खूप इंटरेस्टींग वाटले. लिलीचा रोल माझ्या पर्सनॅलिटीला शोभणारा असल्यामुळे तो मला अधिक आवडला. 

सनी लिऑनने शेवटी म्हटलं की, मी अशी नाही आहे की जी संपूर्ण दिवस बिकनी आणि स्टिलटोसमध्ये फिरू. पण पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सामंजस्य आणण्यासाठी मी अजून प्रयत्न करते आहे.