सनी लिऑनने बर्थ़डे गिफ्ट म्हणून दिली बिकीनी

बॉलीवूड अॅक्टर अथवा फिल्ममेकरर्सनी आपल्या चित्रपटातील को-स्टार अथवा अॅक्टरना महागडी गिफ्ट दिल्याचे आपण ऐकले आहे. कधी कोणी निर्माता आपल्या चित्रपटातील अभिनेत्याला कार गिफ्ट करतो. तर कोणी आपल्या को-स्टारला फ्लॅटसारख्या महागड्या भेटवस्तू देतो. या यादीत आता सनी लिऑनच्या नावाचीही भर पडलीये. 

Updated: Nov 19, 2015, 05:04 PM IST
सनी लिऑनने बर्थ़डे गिफ्ट म्हणून दिली बिकीनी title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अॅक्टर अथवा फिल्ममेकरर्सनी आपल्या चित्रपटातील को-स्टार अथवा अॅक्टरना महागडी गिफ्ट दिल्याचे आपण ऐकले आहे. कधी कोणी निर्माता आपल्या चित्रपटातील अभिनेत्याला कार गिफ्ट करतो. तर कोणी आपल्या को-स्टारला फ्लॅटसारख्या महागड्या भेटवस्तू देतो. गिफ्ट देणाऱ्या अॅक्टरर्सच्या यादीत आता सनी लिऑनच्या नावाचीही भर पडलीये. 

आगामी 'मस्तीजादे' चित्रपटाच्या दिग्दर्शकांना असे गिफ्ट दिलेय ज्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही. दिग्दर्शक मिलाप झावेरी यांना सनीने चक्क बिकीनीचा टी-शर्ट बर्थडे गिफ्ट म्हणून दिलाय.

'मस्तीजादे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनीला अनेकवेळा बिकीनी घालावी लागली. याचा बदला म्हणून तिने झावेरी यांना असे गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे.  'मस्तीजादे' या चित्रपटात सनीसह तुषार कपूर आणि वीरदास यांच्याही भूमिका आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.