रिमी सेनसाठी इतकी मोठी रक्कम मोजून 'बिग बॉस'नं चूक केली?

पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घराचा एक भाग असलेली आणि तरीही या स्पर्धेत सहभागी नसलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री रिमी सेन... या अभिनेत्रीला या कार्यक्रमात आणण्यासाठी किती पैसे मोजले गेले असतील, याची कल्पना तुम्हाला आली तर तुम्हालाही धक्का बसेल... 

Updated: Nov 19, 2015, 04:36 PM IST
रिमी सेनसाठी इतकी मोठी रक्कम मोजून 'बिग बॉस'नं चूक केली? title=

मुंबई : पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घराचा एक भाग असलेली आणि तरीही या स्पर्धेत सहभागी नसलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री रिमी सेन... या अभिनेत्रीला या कार्यक्रमात आणण्यासाठी किती पैसे मोजले गेले असतील, याची कल्पना तुम्हाला आली तर तुम्हालाही धक्का बसेल... 

पहिल्या आठवड्यापासूनच, आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन चूक केली आणि आता ही चूक सुधारत आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायचंय, असं ज्या स्पर्धकाला वाटतंय ती स्पर्धक म्हणजे रिमी सेन... पण, निर्मात्यांनी तिला या कार्यक्रमात आणण्यासाठी किती रुपये मोजले हे तुम्हाला माहीत पडलं तर निर्मात्यांचा हा निर्णय किती चुकीचा होता, हे तुमच्याही लक्षात येईल. 

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रिमीला तब्बल दोन करोड रुपये मोजण्यात आल्याचं समजतंय. उल्लेखनीय म्हणजे, या कार्यक्रमाच्या विजेत्याचं बक्षीस आहे 50 लाख रुपये... म्हणजे, विजेत्यापेक्षा चौपट रक्कम एकट्या रिमीसाठी मोजण्यात आलीय. 

इतर स्पर्धकांना मात्र आठवड्यानुसार पैसे दिले जातात. म्हणजे, जेवढे आठवडे ते घरात राहतील त्या हिशोबानं त्यांना रक्कम दिली जाते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.