एक डर्टी सवालने सनी लिऑन संतापली युवकाच्या कानाखाली भडकवली

 अभिनेत्री सनी लिऑनने एका युवकाच्या प्रश्नावर संताप व्यक्त करुन चक्क कानाखाली भडकवली. 

Updated: Mar 25, 2016, 01:16 PM IST
एक डर्टी सवालने सनी लिऑन संतापली युवकाच्या कानाखाली भडकवली title=

सूरत : येथे आलेल्या अभिनेत्री सनी लिऑनने एका युवकाच्या प्रश्नावर संताप व्यक्त करुन चक्क कानाखाली भडकवली. हा युवक स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो. त्याने काही प्रश्न केले. त्यावेळी सनीने उत्तर दिलीत. मात्र, डर्टी सवालने सनीचा पाराच चढला.

सनी सनी लिऑनची बॉलिवूड येण्याआधी पॉर्नस्टार म्हणून ओळख आहे. तिने ती ओळख बॉलिवूडमध्ये स्थिरावू पुसली आहे. सध्या ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जात आहे. होळीच्या कार्यक्रमात तिची प्रसिद्ध कॅच करण्यासाठी तिला आमंत्रित करण्यात आले. सनीने उपस्थितांसोबत नृत्यही केले. त्यानंतर गर्दीतून बाहेर पडत आपल्या हॉटेलमध्ये गेली. त्यावेळी तिने युवकाच्या एका प्रश्नावर कानाखालीच जाळ काढला.

सनी ज्या हॉटेलमध्ये उतरली होती त्या हॉटेलमध्ये तो युवक घुसला. त्याच्याकडे कार्यक्रमाचा पास देखील होता. मात्र, कोणत्या मीडियाशी संबंधित होता याची माहिती नाही. त्याने सनीला काही सवाल केलेत. त्यांना सनीने उत्तरे दिलीत. त्यानंतर त्याने अश्लील बोलने सुरु केले. त्यानंतर सनीला धक्का बसला. या व्यक्तीच्या मनात काहीतरी वेगळेच चालल्याचे सनीच्या लक्षात आले. त्याने चक्क सनीला प्रश्न केला. रात्रीच्या एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेता. या अनपेक्षित प्रश्नाने सनीचे डोळे लाल झालेत आणि प्रचंड राग आला. तिने सरळ त्याच्या कानाखाली जाळ काढला. त्यानंतर हॉटेल परिसरात हंगामा झाला.