बॉलिवूडमध्ये आणखी एक ब्रेकअपचा धक्का, तीन वर्षांपासून होते लिव्ह इनमध्ये

मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करण्याची मालिका संपण्याचं नाव घेत नाही.

Updated: Mar 25, 2016, 10:18 AM IST
बॉलिवूडमध्ये आणखी एक ब्रेकअपचा धक्का, तीन वर्षांपासून होते लिव्ह इनमध्ये title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करण्याची मालिका संपण्याचं नाव घेत नाही. आता अभिनेत्री परिणीती चोप्राने तिचा बॉयफ्रेंड मनीष शर्मासोबत ब्रेकअप केल्याच्या बातम्या आल्या आहेत. गेली तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या दोघांनी आता थांबण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत वृत्त बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिले आहे.

खरं तर इतरांसारखी या दोघांनी त्यांच्या या रिलेशनशिपविषयी जाहीर वाच्यता केली नाही. पण, बॉलिवूडमधील सर्वांनाच त्याविषयी माहिती होती. गेल्या वर्षापासून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही अडचणी येत होत्या. शेवटी परस्परांना विश्वासात घेऊन त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

या ब्रेकअपमुळे नाराज असलेल्या परिणीतीने मनाला शांती मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियालाही गेली होती, अशी माहिती मिळत आहे. पण, ब्रेकअप झालं असलं तरी ते एकमेकांचे मित्र-मैत्रीण राहणार आहेत. मुख्य म्हणजे परिणीतीचा आगामी सिनेमा 'मेरी प्यार बंधू'ची निर्मिती मनीषच करणार आहे.

गेली काही वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या परिणीती आणि मनीषमध्ये काही दिवसांपासून वादाला सुरुवात झाली. यानंतर मनीषने तो फ्लॅटही सोडला होता. आता मात्र त्यांचे ब्रेकअप झाले आहे.