मुंबई : गूगल इंडियाच्या वार्षिक 'ईअर इन सर्च'नुसार २०१४ साली गुगलच्या सर्च इंजिनवर सगळ्यात जास्त केल्या जाणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन ही सध्या टॉपवर दिसतेय तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी... म्हणजेच, इथं सनीनं पंतप्रधानांनाही मागे टाकलंय.
गूगल सर्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि सुपरस्टार सलमान खानलाही मागे टाकणाऱ्या अभिनेत्री सनी लिओननं नुकत्याच बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिला असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्यात.
यावेळी, सनीनं प्रथम नरेंद्र मोदी यांना शुभेच्छाही दिल्या. 'पंतप्रधानांनी देशाला पुढे घेऊन जावं... मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे... आमच्यासारखे एनआरआय या महान देश असलेल्या भारतात बिझनेस करू शकतील, आणि यासाठी सरकार त्यांची मदत करेल, अशी मला आशा आहे' असं सनीनं म्हटलंय.
गूगल सर्चमध्ये पंतप्रधानांना मागे टाकण्याविषयी सनी म्हणते, '५ वर्षांपूर्वी मी एका कॉलममध्ये म्हटलं होतं, की लोक माझ्यावर चिडतात... प्रेम करतात... पण, सोशल मीडियावर ते मात्र माझ्याचबाबत चर्चा करतात... माझं म्हणणं खरं ठरलंय'.
वर्ष २०१५ हे आपल्यासाठी बॉलिवूडमध्ये जागा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे, असंही सनीनं म्हटलंय. आपल्याला सगळं काही दैवावर विश्वास ठेऊन मिळालेलं नाही, मी त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केलेत हेही ती आवर्जुन सांगते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.