काय असावा मोदींचा संकल्प, सांगतेय सनी लिओन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन्सची संख्या आता प्रचंड वाढलीय. जगभरात त्यांचे चाहते पाहायला मिळतात. पण, त्यांच्या एका सेलिब्रिटी फॅननं नववर्षाच्या निमित्तानं त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्यात. 

Updated: Jan 1, 2015, 05:16 PM IST
काय असावा मोदींचा संकल्प, सांगतेय सनी लिओन title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन्सची संख्या आता प्रचंड वाढलीय. जगभरात त्यांचे चाहते पाहायला मिळतात. पण, त्यांच्या एका सेलिब्रिटी फॅननं नववर्षाच्या निमित्तानं त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्यात. 

ही फॅन दुसरी तिसरी कुणीही नसून नरेंद्र मोदींना गूगल सर्चमध्ये पछाडणारी अभिनेत्री सनी लिओन आहे. बॉलिवूडची बोल्ड गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या सनी लिओननं पंतप्रधान मोदींकडे काही मागणं मागितलंय. नव्या वर्षांत पंतप्रधानांनी अशी काही पावलं उचलावीत ज्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना भारतात बिझनेस करण्यासाठी मदत मिळेल, अशी अपेक्षा तिनं व्यक्त केलीय. 

नरेंद्र मोदींनी ही अपेक्षा नव्या वर्षांचा संकल्प म्हणूनही पुढे न्यावा, अशी अपेक्षा तिनं एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, सनीनं यापूर्वीही पंतप्रधानांना एनआरआयची मदत करण्याचा आग्रह केला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यादरम्यान लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालेत.... मग ते ऑस्ट्रेलिया असो, नेपाळ किंवा अमेरिका... सगळ्याच देशांचे एनआरआय मोदींच्या वत्कृत्वानं प्रभावित झालेत, अशीही पुष्टी सनीनं जोडलीय.

सनी लिओन ही सर्च इंजिन गूगलवर सर्वात जास्त सर्च केली जाणारी व्यक्ती बनलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.