रोडीजची जज बनण्यासाठी सनीने मागितले ४ कोटी रुपये

 ही बातमी खरी असेल तर तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसेल कारण ही बातमी सनी लिऑन संबंधी आहे. यावेळेस सनीने आपली किंमत काही जास्तीत लावली आहे. सनी लिऑनने टीव्ही रिएलिटी शो रोडीजची जज बनण्याची ऑफर मिळाली आहे. पण यासाठी या बयेने ४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Updated: Nov 25, 2014, 04:22 PM IST
रोडीजची जज बनण्यासाठी सनीने मागितले ४ कोटी रुपये title=

नवी दिल्ली :  ही बातमी खरी असेल तर तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसेल कारण ही बातमी सनी लिऑन संबंधी आहे. यावेळेस सनीने आपली किंमत काही जास्तीत लावली आहे. सनी लिऑनने टीव्ही रिएलिटी शो रोडीजची जज बनण्याची ऑफर मिळाली आहे. पण यासाठी या बयेने ४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

 
सनी स्प्लित्झविला या एका टीव्ही शोमध्ये आल्यानंतर या शोचा टीआरपी खूप वाढला होता. त्यामुळे सनीला ही गोष्ट माहित आहे. त्यामुळे या लोकप्रियतेचा सनी फायदा घेऊ पाहत आहे. पण शोच्या प्रोड्युसरचे इतके बजेट नाही आहे. 

यामुळे सनीच्या जागेवर इशा देओल आणि बॉक्सर वीजेंदर सिंग यांना शोमध्ये जज म्हणून घेतले आहे. धूम स्टार इशा देओल लग्नानंतर बऱ्याच काळापासून ग्लॅमर जगापासून दूर आहे. आता ती पहिल्यांदा या शोच्या माध्यमातून टीव्ही जगतात पाऊल ठेवत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.