या अभिनेत्रीला रोज कोणीतरी पाठवतंय १ हजार गुलाब

बॉलिवूड कलाकारांचे अनेक फॅन्स असतात जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. सध्या एका अभिनेत्रीचं घर हे एका गार्डनप्रमाणे झालंय. अभिनेत्री सोनल चौहानचं म्हणणं आहे की तिला रोज कोणीतरी १ हजार फूल पाठवत आहे. 

Updated: May 16, 2016, 06:26 PM IST
या अभिनेत्रीला रोज कोणीतरी पाठवतंय १ हजार गुलाब title=

मुंबई : बॉलिवूड कलाकारांचे अनेक फॅन्स असतात जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. सध्या एका अभिनेत्रीचं घर हे एका गार्डनप्रमाणे झालंय. अभिनेत्री सोनल चौहानचं म्हणणं आहे की तिला रोज कोणीतरी १ हजार फूल पाठवत आहे. 

काही दिवसांपासून ही गोष्ट सुरु आहे. सोनलच्या घरात आतापर्यंत ८ हजाराहून अधिक फूलं मिळाली आहेत. सोनलने फुलांसोबतचा एक फोटो देखील काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. सोनल सध्या अरबाज खानसोबत एका प्रोजेक्टवर काम करतेय.