गायक अभिजीतचं महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टवीट

गायक अभिजीतने महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टि्वट केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी एस स्वातीची हत्या लव्ह जिहादाचा विषय असल्याचं अभिजीतने म्हटलं आहे.

Updated: Jul 3, 2016, 07:28 PM IST
गायक अभिजीतचं महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टवीट title=

मुंबई : गायक अभिजीतने महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टि्वट केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी एस स्वातीची हत्या लव्ह जिहादाचा विषय असल्याचं अभिजीतने म्हटलं आहे.
तसेच हिंदू पालकांना स्वातीसाठी न्याय हवा आहे, असे टि्वट अभिजीतने केले. 
 
अभिजीतच्या या टि्वटवर पत्रकार स्वाती चर्तेुवेदी यांनी आक्षेप घेतला. अभिजीत जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहात. पोलिस त्याच्यावर कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न विचारला. यावर संतापलेल्या अभिजीतने महिला पत्रकारावर अत्यंत वाईट शब्दात टवीट केलीय. अभिजीतने पीएमओच्या टि्वटर हँण्डललाही हे टि्वट केले. 
 
अभिजीतच्या या टि्वटवर अनेकांनी संताप व्यक्त करताना त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी स्वाती चर्तेुवेदी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात अभिजीतवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.