त्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत

एका कन्स्ट्रक्शन कंपनीची केलेली जाहिरात अभिनेता अनिल कपूरला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 3, 2016, 04:20 PM IST
त्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत title=

मुंबई : एका कन्स्ट्रक्शन कंपनीची केलेली जाहिरात अभिनेता अनिल कपूरला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. या कन्स्ट्रक्शन कंपनीनं म्हाडापेक्षा त्यांच्या घरांच्या किंमती कमी असल्याचा दावा केला होता. कंपनीनं जाहिरातीमध्ये विरार आणि नाशिकमध्ये ही घरं असल्याचं सांगितलं होतं. यावरूनच म्हाडानं अनिल कपूरला कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

अनिल कपूरबरोबरच म्हाडानं या कन्स्ट्रक्शन कंपनीलाही नोटीस पाठवली आहे. कंपनीनं फायद्यासाठी म्हाडाचं अयोग्य पद्धतीनं नाव वापरलं, तसंच चुकीची माहिती जाहिरातीतून दिलं असं या नोटीसमध्ये मांडण्यात आलं आहे.   

या वेबसाईटनं त्यांची घरं आणि म्हाडाच्या विरारमधल्या घरांच्या किंमतीमधली तफावतही वेबसाईटवर दाखवली होती.