पोश्टर गर्लचं गाणं रिलीज, सिंपल हवी

Updated: Jan 27, 2016, 05:26 PM IST

मुंबई : पोश्टर गर्ल सिनेमाचं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. सिंपल सिंपल हवी, सिंपलमध्ये डिंपल हवी असे या गाण्याचे बोल आहेत. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बोल्ड अभिनय करून आपल्या, दिलखेच अदा सादर केल्या आहेत.

समीर पाटील यांनी या चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सोनाली कुलकर्णी, हृषिकेश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, जीतेंद्र जोशी, संदीप पाठक, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ मेनन, हेमंत ढोमे आणि अक्षय टंकसाळे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटातील आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे, हे गाणं या आधीचं लोकप्रिय झालं आहे.