श्वेता तिवारी होणार आई

अभिनेत्री श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. नोव्हेंबरमध्ये श्वेता तिवारीच्या घरी पाळणा हालणार आहे.

Updated: Jul 9, 2016, 10:23 PM IST
श्वेता तिवारी होणार आई title=

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. नोव्हेंबरमध्ये श्वेता तिवारीच्या घरी पाळणा हालणार आहे. श्वेता तिवारीनं 2013 मध्ये अभिनेता अभिनव कोहलीबरोबर दुसरं लग्न केलं होतं. श्वेता तिवारीनं तिचा पहिला नवरा राजा चौधरीबरोबर घटस्फोट घेतला आहे. श्वेताला पहिल्या नवऱ्यापासून 15 वर्षांची मुलगी आहे, तिचं नाव पलक आहे. 

'कसौटी जिंदगी की' या गाजलेल्या मालिकेमधून श्वेता घराघरात पोहोचली. 2011 साली श्वेता बिग बॉस सिझन 4ची विजेती झाली होती. बेगुसरायी या मालिकेमध्ये श्वेतानं बिंदीयाची भूमिकाही केली होती.