आई-वडिलांपासून वेगळं राहण्यावर बोलली श्रद्धा कपूर

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आई-वडिलांपासून वेगळं होण्याविषयीच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.

Updated: May 6, 2016, 09:33 PM IST
आई-वडिलांपासून वेगळं राहण्यावर बोलली श्रद्धा कपूर title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आई-वडिलांपासून वेगळं होण्याविषयीच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. पण आता श्रद्धा कपूरनं या बातम्या फेटाळल्या आहेत. आई-वडिलांशिवाय राहण्याचा विचारही मी करु शकत नाही. या बातम्या चुकीच्या आहेत, असं श्रद्धा म्हणाली आहे. 

मला एक अपार्टमेंट मिळालं आहे, पण तिथे मी फक्त सामान ठेवणार आहे. मी माझ्या आई-वडिलांसोबत खुश आहे, अशी प्रतिक्रिया श्रद्धानं दिली आहे.

श्रद्धा कपूरचा बागी चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यानंतर आता श्रद्धानं ओके जानू या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.