धक्कादायक! अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर बीग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीची एक बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरताना दिसतेय... या बातमीनं अनेकांना हादराच दिला. 

Updated: Jan 21, 2017, 12:07 AM IST
धक्कादायक! अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर बीग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीची एक बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरताना दिसतेय... या बातमीनं अनेकांना हादराच दिला. 

धक्कादायक म्हणजे, बीग बी अमिताभ बच्चन यांच्या निधनाची ही बातमी होती. यासोबत निपचित पहुडलेल्या स्थितीतील अमिताभ आणि विषणान्न अवस्थेतील अभिषेक बच्चन यांचे फोटोही सोबत धाडले जाताना दिसतात. 

या बातमीमुळे अनेकांना धक्काच बसला... काहींनी ही बातमी खरी समजून तातडीनं 'फॉरवर्ड' करण्याची घाई केली... परंतु, काहींनी मात्र या बातमीची खातरजमा करत ही बातमी आणि पोस्ट फेक असल्याचं समजल्यानंतर देवाचे आभार मानले. 


फेक न्यूज 

याआधीही बच्चन कुटुंबातील ऐश्वर्या राय बच्चन हिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती... या 'फेक न्यूज' पाकिस्तानमधून फॉरवर्ड होत असल्याची शंका आहे.

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या फॅन्सना हे ऐकून दिलासा मिळेल की त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहेत.