दीपिका-विनची केमिस्ट्री जोरात, रणवीरचं काय?

देसी गर्ल प्रियांका चोप्रा पाठोपाठ, बॉलिवूडच्या मस्तानीनंही हॉलिवूडमध्ये एन्ट्री  केलीये. हॉलिवूड स्टार विन डिझेलसोबत तिच्या ट्रिपल एक्स फिल्मची जोरदार चर्चाही झाली. मात्र आता फिल्मपेक्षा दीपिकाच्या विनसोबतच्या लव्हेबल केमेस्ट्रीचीच अधिक चर्चा रंगू लागलीय.

Updated: Jan 20, 2017, 08:28 PM IST
दीपिका-विनची केमिस्ट्री जोरात, रणवीरचं काय? title=

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा पाठोपाठ, बॉलिवूडच्या मस्तानीनंही हॉलिवूडमध्ये एन्ट्री  केलीये. हॉलिवूड स्टार विन डिझेलसोबत तिच्या ट्रिपल एक्स फिल्मची जोरदार चर्चाही झाली. मात्र आता फिल्मपेक्षा दीपिकाच्या विनसोबतच्या लव्हेबल केमेस्ट्रीचीच अधिक चर्चा रंगू लागलीय.

किंग खान शाहरुखसोबत 'ओम शांती ओम' म्हणत सिनेमाच्या पडद्यावर एन्ट्री केलेल्या दीपिका पदुकोणची गाडी बॉलिवूडमध्ये सध्या सुसाट सुटलीय. बाजीराव मस्तानीनंतर आता दीपिकाच्या राणी पद्मावतीची चर्चा आहे. मात्र, त्याहीपेक्षा बॉलिवूडची ही मस्तानी अधिक चर्चेत आहे ती तिच्या लव्ह स्टोरीजमुळे...

रणबीर कपूर, युवराज सिंग, रणवीर सिंग आणि आता विन डिझेल... दीपिकाच्या हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतल्या ब्रेकची चर्चा एवढी रंगली नाही, जेवढी तिच्या ब्रेकअपची चर्चा रंगते. स्टार कलाकारांसोबतच्या आपल्या लव्ह स्टोरीजमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली दीपिका म्हणजे फिल्मी वर्तुळातील एक अजब रसायन...


दीपिका आणि रणवीर

दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से आतापर्यंत तिच्या चाहत्यांनी ऐकले असतील. मात्र एखाद्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत असतानाच त्यांच्या ब्रेकअपची कुजबूजही लगेचच सुरू होते.  दीपिकाच्या बाबतीत तर हा अनुभव वारंवार येतो.

रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्याचं कळतं न कळतं तोच रणवीर सिंगसोबत तिचे सूर जुळल्याचं पहायला मिळालं. तर आता गेल्या काही दिवसांत रणवीर सिंगसोबत तिची लव्हस्टोरी ऐन रंगात असतानाच दीपिकाचं नाव आता ट्रिपल एक्समधील तिचा कोस्टार विन डिझेलसोबत जोडलं जाऊ लागलंय. 

याबाबत एका अमेरिकन टीव्ही शोमध्येही दीपिकाला याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला होता. यावरूनच विन आणि दीपिकाच्या या लव्हस्टोरीची आता थेट हॉलिवूड इंडस्ट्रीतही चर्चा रंगू लागल्याचं सिद्ध होतंय. विन तर अक्षरशा: दीपिकावर सध्या फिदा आहे. दीपिकाचं कौतुक करताना तो अजिबात थकत नाहीए...

XXX च्या प्रमोशनच्या वेळी विन आणि दीपिकाची ही केमेस्ट्री म्हणूनच लक्षवेधी ठरली होती. एकीकडे रणवीर सिंगसोबत दीपिका आतापर्यंत ठिकठिकाणी लव्ह बर्ड्स म्हणून एकत्र झळकलीय. मात्र विन डिझेलसोबतच्या तिच्या नव्या केमेस्ट्रीमुळे रणवीरचं आता काय होणार? हा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला असेल... देखते है आगे आगे होता है क्या...