ही अभिनेत्री आहे, ३४ मुलांची आई

'मदर्स डे'च्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करतांना दिसला, मात्र बॉलीवूडमध्ये काही तारे असेही आहेत, की ज्यांनी मदर्स डे सेलिब्रेट हटके साजरा केला. सोनाक्षी सिन्हासह अनेक अभिनेत्रींनी आपले फोटो ट्ववीटरवर शेअर केले.

Updated: May 11, 2015, 11:05 PM IST
ही अभिनेत्री आहे, ३४ मुलांची आई title=

मुंबई  : 'मदर्स डे'च्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करतांना दिसला, मात्र बॉलीवूडमध्ये काही तारे असेही आहेत, की ज्यांनी मदर्स डे सेलिब्रेट हटके साजरा केला. सोनाक्षी सिन्हासह अनेक अभिनेत्रींनी आपले फोटो ट्ववीटरवर शेअर केले.

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी काही मुलं दत्तक घेतली, यात प्रिति झिंटा ३४ मुलींची आई आहे, असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही. प्रिटी झिंटाने सहा वर्षापूर्वी ३४ व्या जन्मदिनाच्या मुहूर्तावर ऋषिकेशच्या मदर मिरॅकल स्कूलमधून ३४ मुलींना दत्तक घेतलं होतं.

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत, ज्यांनी मुलं दत्तक घेतली आहेत, देशातील महिलांना सेकंड सिटीझन मानलं जातं, मी आपल्या मुलींना एक सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आई म्हणून असणारे त्यांचे सर्व निर्णय मी घेते, असंही प्रिति झिंटाने म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.