'बिग बींना राष्ट्रपती करा'

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना देशाचा पुढचा राष्ट्रपती करा अशी मागणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.

Updated: Mar 18, 2016, 10:18 AM IST
'बिग बींना राष्ट्रपती करा' title=

पाटणा: बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना देशाचा पुढचा राष्ट्रपती करा अशी मागणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. 

अमिताभ हे देशाचे सांस्कृतिक आयकॉन आहेत, त्यांना राष्ट्रपती बनवलं तर ही अभिमानाची गोष्ट असेल. अमिताभ यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते राष्ट्रपती झाले तर भारताचं नाव आणखी चांगलं होईल, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. 

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलीवूडमधल्या काला पथ्थर, दोस्ताना आणि शान या सूपर हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यामध्ये अभिषेक बच्चनच्या लग्नावेळी वाद झाल्याचं बोललं गेलं. अमिताभ यांनी लग्नाला न बोलावल्यानं शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले, त्यानंतर अमिताभ यांनी पाठवलेली मिठाईपण शत्रुघ्न सिन्हांनी परत पाठवली अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता खुद्द शत्रुघ्न सिन्हांनीच अमिताभ यांच्यासाठी बॅटिंग केली आहे.