मुंबई: केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते अभिनेता आणि चित्रपट निर्माते शशी कपूर यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पृथ्वी थेएटरमध्ये झालेल्या संमारंभाला अनेक दिग्गज कलावंत उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अरुण जेटली म्हणाले, शशी कपूर एक महान अभिनेते आहेत. महान विरासतीचे ते प्रतिक आहेत. आजच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी आहेत. तर बीग बी अमिताभ बच्चन म्हणाले, बॉलिवूडमध्ये शशी कपूर यांचं योगदान कौतुकास्पद आहे.
शशी कपूर यांना प्रकृती अस्वस्थतेमुळं दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला जाता आलं नाही म्हणून मुंबईत पृथ्वी थेएटरमध्ये खास आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदाश करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.
१९३८मध्ये जन्मलेल्या शशी कपूर यांनी वयाच्या ४ वर्षी आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली. १९४०मध्ये दशकाच्या अखेरीस बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपट अभिनयाला सुरूवात केली. बाल कलाकार म्हणून त्यानं 'आग' (१९४८), आवारा (१९५१) चित्रपटांमध्ये काम केलं. शशी कपूर यांनी १९५०च्या दशकात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं.
शशी कपूर यांनी अभिनेता म्हणून १९६१ साली सुरूवात केली. त्यांचा पहिला चित्रपट 'धर्मपुत्र'... त्यानंतर ६०-७० आणि ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत त्यांनी तब्बल ११६ हून अधिक चित्रपट केले. शशी कपूर यांना २०११मध्ये पद्म भूषण देऊनही सन्मानित करण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.