स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अभिनेता शाहरुख खान यानं मोदींच्या या अभियानासाठी हातात झाडू घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र मोदींच्या या अभियानाला पाठिंबा दर्शवत जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. 

Updated: Nov 13, 2014, 03:25 PM IST
स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा नकार title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अभिनेता शाहरुख खान यानं मोदींच्या या अभियानासाठी हातात झाडू घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र मोदींच्या या अभियानाला पाठिंबा दर्शवत जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरु केली आहे.  या मोहिमेत शाहरुखही हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरणार का? असा सवाल शाहरुखला विचारण्यात आला. यावर शाहरुख म्हणतो, मला हातात झाडू घ्यायला आवडत नाही. पंतप्रधान आणि अन्य सेलिब्रिटींनी ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. 

सेलिब्रिटींनी या मोहीमेत सहभाग घेतल्यानं जनतेमध्ये जनजागृती होते आणि यापुढं कचरा फेकताना ते विचार करतील, हाच या मोहीमेचा उद्देश असल्याचं शाहरुखनं सांगितलं.  टेनिसपटू सानिया मिर्झानं शाहरुख खानला स्वच्छ भारत मोहिमेसाठी नॉमिनेट केलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.