‘फॅन्ड्री’ आता मोबाईल अॅपवर

महाराष्ट्रभर गाजलेला ‘फॅन्ड्री’ हा मराठमोळा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होणार आहे.  नुकताच हा चित्रपट  गुगल प्ले, आय-ट्यून्स आणि फेसबूक प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Nov 13, 2014, 11:59 AM IST
‘फॅन्ड्री’ आता मोबाईल अॅपवर title=

मुंबई : महाराष्ट्रभर गाजलेला ‘फॅन्ड्री’ हा मराठमोळा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होणार आहे.  नुकताच हा चित्रपट  गुगल प्ले, आय-ट्यून्स आणि फेसबूक प्रदर्शित करण्यात आलाय. 

 

डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर करून मराठीत अशा प्रकारे प्रदर्शित होणारा ‘फॅन्ड्री’ हा पहिलाच चित्रपट ठरेल. 

 

मोबाईल अॅप आणि डिजिटल माध्यमात रुपांत झाल्यानं हा चित्रपट आता कोणत्याही देशामधून पाहता येणं शक्य होणार आहे.

 

‘सिने कारवान’ ही नावाजलेली कंपनीनं या चित्रपटाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रदर्शन करत आहे. अमेझॉन, फेसबुक, बी स्काय बी, नेटफिक्स यांसह अनेक सोशल व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.