शाहरुख म्हणाला, जर माझ्या मुलीला कोणी किस केल तर...

बॉलीवूड किंग खान शाहरुख आणि आलिया भट्ट लवकरच कॉफी विद करणच्या 5व्या सीझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. या पहिल्या एपिसोडचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. टीझर पाहून या एपिसोडबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झालीये.

Updated: Nov 5, 2016, 08:33 AM IST
शाहरुख म्हणाला, जर माझ्या मुलीला कोणी किस केल तर... title=

मुंबई : बॉलीवूड किंग खान शाहरुख आणि आलिया भट्ट लवकरच कॉफी विद करणच्या 5व्या सीझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. या पहिल्या एपिसोडचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. टीझर पाहून या एपिसोडबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झालीये.

या प्रोमोमध्ये शाहरुख खानने त्याच्या मुलीबाबत एक धक्कादायक कमेंट केलीये. यात करण शाहरुखला विचारतो जर तुझी मुलगी सुहानाला कोणी किस केला तर तू काय करशील? यावर उत्तर देताना शाहरुख हसत हसत म्हणतो, मी त्याचे ओठ तोडून टाकेन.

करण जोहरच्या या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना आलिया आणि शाहरुखची चांगलीच धम्माल पाहता येणार आहे. कॉफी विथ करण उद्यापासून स्टार वर्ल्डवर टेलिकास्ट होणार आहे.