आम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण...

 बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात. 

Updated: Aug 25, 2015, 07:20 PM IST
आम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण... title=

नवी दिल्ली :  बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात. 

आता शाहरुख खानने यावर वक्तव्य करताना म्हटले आहे, की तिन्ही खान एका चित्रपटात काम करील पण तिघांच्या भूमिकांना सारखं महत्व हवे. 

आणखी वाचा : आमीर खान हमसून-हमसून रडला, ट्विटरवर टिवटिवाट

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला की, सलमान आणि आमीर सोबत काम करण्यात काही हरकत नाही. आम्हांला अशा चित्रपटाची निवड करावी लागेल त्या ठिकाणी तिघांच्या भूमिका सारख्या वजनाच्या असतील. आम्हांला घोस्टबस्टर्स सारखा चित्रपट करायला आवडले. यात तिन्ही स्टार कलाकारांच्या भूमिका सारख्या आहेत. असा चित्रपट आम्ही एकत्र मिळून प्रो़ड्युस करू शकतो. पण अशी कहाणी हवी जी तिघांना पसंत पडली पाहिजे. 

आणखी वाचा : शाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक साँग

 

या पूर्वी आमीर खान म्हटला होता की तिन्ही खान एकाच चित्रपटात असल्यास ती जबरदस्त होईल. असे झाल्यास चांगली गोष्ट असेल. 

तर सलमानने म्हटले की, शाहरुखसोबत काही वाद नाही. तो चांगला मित्र आहे. 

तिन्ही खानांच्या फॅन्स त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा आहे. पाहु या आता तिन्ही खान फॅन्सची इच्छा पूर्ण करतात का? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.