मुंबई: 'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.
देशातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेविरोधात किंग खाननं टीकास्त्र सोडलं होतं. असहिष्णुतेमुळं आपली अंधःकाराकडे वाटचाल सुरु असून त्यामुळं भारताचा खरा चेहरा हरवत चालल्याची भावनाही शाहरुखनं व्यक्त केली होती.
Any such Muslim, even Shahrukh who is facing difficulty and discrimination in India because of Islam are invited to stay in Pakistan - End
— Hafiz Muhammad Saeed (@HafizSaeedJUD01) November 3, 2015
त्यावर भाजपचे सचिव कैलास विजयवर्गीय यांनी ट्विटरवरून शाहरूखवर टीका केली होती. शाहरूख खान भारतात कोट्यवधी कमावतो, राहतो पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं विजयवर्गीय म्हणाले. त्यानंतर हाफिज सईदनं शाहरूखला पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.