बहुचर्चित सरकार-३ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार थ्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आणखी एक नवा अवतार पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. हा सिनेमा येत्या 7 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र काही कारणास्तव सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सरकार थ्री आता 7 एप्रिलऐवजी 12 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Updated: Mar 24, 2017, 09:43 AM IST
बहुचर्चित सरकार-३ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली title=

मुंबई : राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार थ्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आणखी एक नवा अवतार पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. हा सिनेमा येत्या 7 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र काही कारणास्तव सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सरकार थ्री आता 7 एप्रिलऐवजी 12 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सरकार-3 मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, यामी गौतम, सुप्रिया पाठक, अमित साध आणि रोहिणी हत्तंगडी हे कलाकार देखील आहेत.