मुंबई: बॉलीवूडमध्ये सुपर हिट ठरलेल्या आमिर खानच्या सरफरोशचा सिक्वल येणार आहे. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांनी याला दुजोरा दिला आहे. सरफरोशचा हा सिक्वल पुढच्या वर्षी येणार आहे.
1999 मध्ये आलेल्या सरफरोशचा सिक्वल यावा अशी आमिरची इच्छा होती, आणि त्यानं ती जॉनला बोलून दाखवली, तसंच या चित्रपटाच्या स्क्रिप्टवरही काम करायला आमिरनं जॉनला 2013 मध्ये सांगितलं.
हा चित्रपट पुढच्या वर्षी येणार असं बोललं जात असलं तरी त्याची स्क्रिप्ट अजून तयार झाली नाही, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक जॉन मॅथ्यूनी दिली आहे. पहिल्या चित्रपटापेक्षा सिक्वलची स्टोरी वेगळी असेल, असंही जॉन म्हणाला आहे. आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट दंगलच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
सरफरोशमध्ये आमिरनं मुंबईच्या क्राईम ब्रांचचा ऑफिसर अजय सिंग राठोडची भूमिका केली होती. पाकिस्तानमधल्या दहशतवादावर आधारित हा सिनेमा होता. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी या चित्रपटामध्ये व्हिलनची भूमिका केली होती.